BNR-HDR-TOP-Mobile

Pune : सतर्कतेमुळे टळला अनर्थ; अग्निशमन दलाच्या दोन जवानांची कामगिरी

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – शहराच्या विविध भागात अग्निशमन दलाचे वाहन आणि जवान अनेक बंदोबस्ताकामी तैनात असतात. बंदोबस्त म्हटल की अधिक सतर्कता ओघाने आलीच. महापालिकेच्या अग्निशमन दलाकडे असे अनेक बंदोबस्त पा़र पाडले जातात. वाहन आणि जवान बंदोबस्ताकरिता गेले की सतर्कता बजावत कर्तव्य पार पाडावे लागते. वेळप्रसंगी जीवावर खेळून आगीचा सामना करावा लागतो.

अशीच एक घटना काल (रविवार) संध्याकाळी सिंहगड रस्त्यावर एका बंदोबस्ताच्या ठिकाणी घडली. परंतू, दलाच्या दोन जवानांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. बंदोबस्ताच्या ठिकाणी अचानक एका केबलने पेट घेतल्याने एकच गोंधळ उडाला. परंतू, तिथे बंदोबस्तावर असणारे जवान नागेश गजधने आणि केतन नरके यांनी तत्परतेने अग्निरोधक यंत्राच्या साह्याने केवळ दोन ते तीनच मिनिटात आग पूर्ण विझवली.

  • यावेळी तिथे उपस्थित हजारो नागरिकांनी टाळ्या वाजवून या जवानांचे कौतुक केले. यांच्या तत्परतेमुळे पुढील अनर्थ टळला असे मत तेथील उपस्थितांनी व्यक्त केले. तसेच वाहनचालक रविंद्र नेटके आणि जवान संतोष जोशी यांचेही आभार मानले.
HB_POST_END_FTR-A2

.