Pune : पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाने बोलावली पाणीटंचाईबाबत बैठक; नागरिक आणि गृहनिर्माण संस्थांना केले आमंत्रित

एमपीसी न्यूज : – पिण्याच्या आणि घरगुती वापराच्या(Pune ) पाण्याची टंचाई लक्षात घेऊन मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेला (पीआयएल) उत्तर देण्यासाठी आणि न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्यासाठी, एक विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे.

या समितीमध्ये पुणे जिल्ह्याचे विभागीय आयुक्त, पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त, पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागांचे मुख्य अभियंता आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव यांचा समावेश आहे.

PCMC : कचरा सेवा शुल्काला स्थगिती नाहीच, 46 कोटी वसूल

या विशेष समितीची उद्घाटन बैठक आज (गुरुवारी) पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालय येथील व्हीसी हॉलमध्ये होणार आहे.

हायकोर्टात याचिकाकर्त्यांचे प्रतिनिधित्व (Pune )करणारे अधिवक्ता सत्या मुळ्ये यांनी बैठकीचे महत्त्व पटवून देताना सांगितले की, “नागरिकांना त्यांच्या पाण्याच्या टँकरची बिले आणि पाण्याच्या गरजांशी संबंधित डेटा आणण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. ही बैठक महत्त्वपूर्ण आहे आणि पुणे महापालिका आणि पिपंरी-चिंचवड महापालिका मधील सर्व गृहनिर्माण संकुलातील प्रतिनिधींना त्यांच्या पाणी पुरवठ्याशी संबंधित समस्या मांडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

 

 

 

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share