Pune : कोरोना संकटामुळे पुणे फेस्टिवल यंदा रद्द – सुरेश कलमाडी

Pune Festival canceled this year due to corona crisis: Suresh Kalmadi : यावर्षी केवळ मूर्तीची प्रतिष्ठापना आणि विसर्जन होणार आहे.

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा पुणे फेस्टिवल रद्द करण्यात येत असल्याची माहिती माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी आज, बुधवारी दिली. यावर्षी केवळ मूर्तीची प्रतिष्ठापना आणि विसर्जन होणार आहे.

कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेले संकट लवकर संपावे, अशी श्री. गणेश चरणी प्रार्थना करतो. पुढील वर्षी नव्या उत्साहाने, दिमाखदारपणे पुणे फेस्टिवल साजरा होईल, असा विश्वास कलमाडी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात व्यक्त केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

सातत्याने ३१ वर्षे होत असलेलया पुणे फेस्टिवलला कोरोनामुळे यंदा ब्रेक लागला आहे. दि. 21 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2020 या गणेशोत्सव काळात संपन्न होणारा 32 वा पुणे फेस्टिवल रद्द करण्याचा आला आहे. यावर्षी केवळ मूर्तीची प्रतिष्ठापना आणि विसर्जन होणार आहे.

लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून सार्वजनिक गणेशोत्सव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेला. त्यापासून प्रेरणा घेऊन कला – संस्कृती, गायन – वादन, नृत्य, संगीत व क्रीडा यांचा मनोहारी संगम असणाऱ्या पुणे फेस्टिवलचे आयोजन पुणे फेस्टिव्हल कमिटी, पुणेकर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि भारत सरकारचा पर्यटन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने केले जाते.

पुणे फेस्टिवलने पुण्याचे नाव जगाच्या नकाशावर नेले आहे. सलग 10 दिवस आणि सातत्याने 31 वर्षे अखंडित चालू असलेला पुणे फेस्टिवल हा देशातील मोठा सांस्कृतिक महोत्सव मानला जातो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.