_MPC_DIR_MPU_III

Pune : पुणे ग्रामीणच्या ‘एलसीबी’ पथकाकडून गावठी पिस्तुलासह सराईत गुन्हेगार जेरबंद

Pune Grameen's LCB squad arrests criminals in Sarait with village pistols

एमपीसी न्यूज : खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण अशा गंभीर गुन्ह्यातील फरार असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला गावठी पिस्टलसह जेरबंद करण्यात पुणे ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आज, शनिवारी यश मिळाले. या आरोपीकडून गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतूस, असा 51 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

_MPC_DIR_MPU_IV

तुकाराम उर्फ नांजी सखाराम बडदे (वय 23, रा.कोडीत, ता. पुरंदर, जि. पुणे), असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक लोणीकाळभोर हद्दीत संचारबंदीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी बोरिभडक फाटा येथे एक जण गावठी पिस्तुलासह थांबला असल्याची माहिती मिळाली.

_MPC_DIR_MPU_II

त्यानुसार पथकातील पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाव घेत आरोपी बडदे याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ 50 हजार रुपये किमतीचे एक लोखंडी गावठी बनावटीचे पिस्तुल, दोन जिवंत काडतुस, असा एकूण 51 हजारांचा मुद्देमाल आढळून आला.

पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त करून बडदे याला अटक केली. पुढील कारवाईसाठी त्याला यवत पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

बडदे याच्यावर जेजुरी, सासवड आणि येरवडा पोलीस ठाण्यात पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत. जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुनाच्या प्रयत्नातील एका गुन्ह्यात तो फरार होता, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, अमोल गोरे, सहायक फौजदार शब्बीर पठाण, पोलीस हवालदार रौफ इनामदार, पोलीस नाईक विजय कांचन, लियाकत मुजावर, गुरू जाधव, पोलीस शिपाई धीरज जाधव, मंगेश भगत, अमोल शेडगेे, सुधीर अहिवळे यांच्या पथकाने केली.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1