Pune : हडपसर ऐवजी लोणी काळभोरपर्यंत मेट्रो नेणार- डॉ अमोल कोल्हे

एमपीसी न्यूज- स्वारगेट ते हडपसर मार्गावर हडपसर ऐवजी लोणीकाळभोरपर्यंत मेट्रो मार्ग वाढविण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. जुना आराखडा हा स्वारगेट ते हडपसर होता तो बदलून पुढील अहवाल सादर करण्याचा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी ‘पीएमारडीए’ च्या अधिकाऱ्यांना केल्या.

शुक्रवारी पुणे येथे ‘पीएमआरडीएच्या’ च्या सर्व प्रकल्पांची आढावा बैठक घेतली, लोकसभा मतदारसंघात चालू असलेल्या विविध विकासकामांचा याठिकाणी आढावा घेण्यात आला.

हडपसर भागात होणारी वाहतूक समस्या दूर करण्यासाठी प्रस्तावित मेट्रो मार्गामुळे वाहतुकीचा प्रश्न निश्चितच कमी होईल व शिरूर लोकसभेचा विकास होण्यासाठी महत्वाचा टप्पा ठरेल असे खासदार डॉ अमोल कोल्हे म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, हडपसरचे आमदार चेतन तुपे, खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील, महानगर आयुक्त विक्रम कुमार, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित व अधिकारी वर्ग उपस्थित होता.

मेट्रोच्या आढावा बैठकीत अजित पवार यांचे धडाकेबाज निर्णय

# डीपीआर करण्याचे आदेश
# पुणे मेट्रोचे नाव बदलून पुणे पिंपरी चिंचवड मेट्रो करण्याच्या सूचना
# पिंपरी स्वारगेट मेट्रो मार्ग वाढवून निगडी कात्रज होणार
# वनाज रामवाडी मार्ग वाढवून चांदणी चौक ते वाघोली असा होणार
# शिवाजीनगर हिंजवडी हा पीएमआरडीए करत असलेला मेट्रोचा मार्ग शिवाजीनगर माण असा वाढवणार
# स्वारगेट हडपसर ऐवजी स्वारगेट लोणीकाळभोर हा नवा मेट्रो मार्ग प्रस्तावित
# निगडी चाकण मेट्रो मार्गाची चाचपणी करण्याचे आदेश
# खडकवासला ते स्वारगेट मेट्रो मार्ग प्रस्तावित
# वारजे ते शिवाजीनगर या मार्गाचा विचार करण्याच्या सूचना
# शहरातला एचसीएमटीआर २४ मीटर ऐवजी ८ मीटर होणार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.