Pune : पुणे लोकसभा शिवसेनेची (उद्धव गट) घोषणा हवेतच

एमपीसी न्यूज – आगामी लोकसभा निवडणुकीत (Pune )पुण्याचा खासदार हा शिवसेनेचाच (ठाकरे गट) असेल, असे ठणकावून सांगणाऱ्या नेते संजय राऊत यांची घोषणा हवेतच होती, हे आता निश्चित झाले आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात पुणे लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसच्या वाट्याला येणार आहे. त्यामुळे शरद पवार आणि उध्दव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना आता काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करावा लागणार आहे.

सध्या सर्वच राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीची तयारी (Pune )सुरू केली आहे. येत्या काही दिवसांतच या निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. शिवसेनेच्या पुण्यात झालेल्या मेळाव्यात संजय राऊत यांनी पुणे लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त केला होता.

Pune :मतदार नोंदणीसाठी महाविद्यालयांनी पुढाकार घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे आवाहन

त्यांच्या या घोषणेनंतर माजी मंत्री शशिकांत सुतार, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, पुणे शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांच्या नावाची चर्चा सुरू होती. 2014 पासून काँग्रेसचा उमेदवार पराभूत होत आहे. त्यामुळे हा मतदारसंघ घटक पक्षांना देण्याची मागणी करण्यात येत होती.

मात्र, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुणे लोकसभा मतदारसंघ हा आमचा पारंपरिक मतदारसंघ असल्याने तो सोडता येणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आता घटक पाक्षांना काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचार करण्या वाचून दुसरा पर्याय नसल्याचे बोलले जात आहे. पुण्यात शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे त्याचा फायदा काँग्रेसच्या उमेदवाराला होण्याची शक्यता आहे.

मोदी लाटेत पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र, काही महिन्यांपूर्वीच झालेल्या कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले. त्यामुळे भाजपच्या बालेकिल्ल्यात पराभव करता येऊ शकतो, हा संदेश गेला आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.