Pune : पुणे-लोणावळा दरम्यान दोन लोकल रद्द

एमपीसी न्यूज – पुणे-लोणावळा विभागात रेल्वे रुळांच्या देखभालीचे काम करण्यासाठी पुढील तीन आठवडे (दि. 5 ते 26 फेब्रुवारी) दुपारच्या वेळेतील दोन लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तर एक लोकल 15 मिनिटे नियोजित वेळेपेक्षा अगोदर धावणार आहे.

# गाडी क्रमांक 99818 पुणे स्थानकावरून दुपारी 1 वाजता सुटणारी गाडी रद्द करण्यात आली आहे.
# गाडी क्रमांक 99813 लोणावळा स्थानकावरून दुपारी 02 वाजता सुटणारी गाडी रद्द करण्यात आली आहे.
# गाडी क्रमांक 99816 पुणे स्थानकावरून दुपारी 12.15 वाजता सुटणारी गाडी 15 मिनिटे अगोदर म्हणजेच 12 वाजता सुटणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.