Pune : पुणेकरांना मिळणार पुणे-मुंबई महामार्गावरील हवेच्या गुणवत्तेची सद्यस्थिती

पुणे-मुंबई महामार्गावर हवेची गुणवत्ता पाहणी करणारे केंद्र

एमपीसी न्यूज- वाढती रहदारी आणि पुणे शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता पुणे-मुंबई महार्मागालगतच्या परिसरातील हवेच्या गुणवत्तेचा अभ्यास करणाऱ्या  “सफर’ या संस्थेतर्फे हवेच्या गुणवत्तेची पाहणी करणाऱ्या यंत्रणेची उभारणी करण्यात आली आहे. अशी माहिती आयआयटीएम-सफरचे माजी उपसंचालक डॉ. दिलीप चाटे यांनी दिली आहे. यामुळे पुणेकरांना आता मुंबई-पुणे महामार्गावरील हवेच्या गुणवत्तेची सद्यस्थिती कळणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

शहर आणि परिसरातील हवेच्या गुणवत्तेचा अभ्यास करण्यासाठी या संस्थेतर्फे शहरात विविध ठिकाणी ही केंद्रे उभारण्यात आली आहेत. “सफर’  ही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपोकल मेटरोलॉजी (आयआयटीएम) या केंद्रीय संस्थेची सहयोगी संस्था आहे. आतापर्यंत या केंद्रांची संख्या 11 होती. यामध्ये आता आणखी एका केंद्राची भर पडली असून शहरात आता एकूण 12 केंद्रे कार्यान्वित झाली आहेत.

शिवाजीनगर, पाषाण, लोहगाव, आळंदी, कात्रज, हडपसर, भोसरी, निगडी, मांजरी, कोथरूड आणि पिंपरी-चिंचवड याठिकाणी ही केंद्रे उभारण्यात आली आहेत. या पाहणी केंद्रांकडून हवेतील विविध घटकांच्या प्रमाणाबाबत माहिती गोळा केली जाते. याच माहितीच्या आधारे हवेतील गुणवत्ता चांगली आहे की वाईट, आणि त्याचे प्रमाण किती याबाबत निष्कर्ष काढला जातो. एका केंद्रातर्फे सुमारे 50 किलो मीटरपर्यंतच्या परिसरातील हवेची सद्यस्थिती अभ्यासता येते, अशी माहिती  डॉ. दिलीप चाटे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.