Pune : शुक्रवारपासून पंधरा दिवसासाठी सिंहगड व प्रगती एक्स्प्रेस रद्द

मुंबईत येण्या-जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा

एमपीसी न्यूज- पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील वाहतूक 26 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान तांत्रिक दुरुस्ती व अन्य कामांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. लोणावळा ते कर्जत दरम्यान हे दुरुस्तीचं काम हाती घेतलं जाणार आहे. या कालावधीत पुण्याहून मुंबईला येणाऱ्या सिंहगड व प्रगती एक्स्प्रेस या गाड्या आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. याशिवाय, अन्य 13 गाड्या पुण्यापर्यंत तसेच पुण्यापासून पुढे धावणार आहेत.

या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. मुंबईहून सुटणाऱ्या कोयना, सह्यादी, महालक्ष्मी एक्स्प्रेस पुण्याहून सुटणार आहेत. त्यामुळं या आठ दिवसांत प्रवाशांनी मुंबईत येण्या-जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.