Pune: राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात पुणे महापालिका दहाव्या क्रमांकावर

Pune: Pune Municipal Corporation ranks 10th in National Tuberculosis Eradication Program देशातील ३६ राज्यांपैकी निर्देशाकांनुसार महाराष्ट्र राज्य १३ व्या क्रमांकावर आले आहे. जास्त लोकसंख्या असलेल्या राज्यांच्या सुचीमध्ये महाराष्ट्र राज्याने ८ व्या क्रमांकाचे स्थान प्राप्त केले आहे. सन २०१८ मध्ये महाराष्ट्र राज्य हे ३० व्या क्रमांकावर होते.

एमपीसी न्यूज- केंद्र शासनाच्या सेंट्रल टीबी डिव्हीजनकडून राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत पुणे महापालिका २०१९ मध्ये राज्यात दहाव्या क्रमांकावर आली आहे. २०१८ मध्ये हा क्रमांक ६१ वा होता. याबाबतचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे.

देशातील ३६ राज्यांपैकी निर्देशाकांनुसार महाराष्ट्र राज्य १३ व्या क्रमांकावर आले आहे. जास्त लोकसंख्या असलेल्या राज्यांच्या सुचीमध्ये महाराष्ट्र राज्याने ८ व्या क्रमांकाचे स्थान प्राप्त केले आहे. सन २०१८ मध्ये महाराष्ट्र राज्य हे ३० व्या क्रमांकावर होते.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील क्षयरोग विभागाने २०१९ साली जास्तीत जास्त क्षयरोग्यांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. जानेवारी ते डिसेंबर २०१९ पर्यंत ७ हजार ४५० क्षयरोगी शोधून काढण्याचे ध्येय देण्यात आले होते.

त्यापैकी ६ हजार ६२१ क्षयरोगीपर्यंत पोहोचला आहे. त्या रुग्णांना मोफत औषोधोपचार देणे, पोषण आहारासाठी दरमहा प्रत्येकाच्या बँक खात्यात ५०० रुपये जमा करणे, रुग्ण पळ काढणार नाहीत सातत्याने पाठपुरावा करणे, अशी कामे करण्यात आली.

तसेच, एचआयव्हीचे महापालिकेने ८६ टक्के रुग्ण शोधून काढले. ही संख्या ६ हजार ३४५ इतकी आहे. क्षयरोगींना शोधणे हे मोठे आव्हान आहे.

मात्र, पुणे महापालिकेने जनजागृती, खासगी डॉक्टरांच्या बैठका, मेळावे आणि प्रयोगशाळा, औषध विक्रेते यांच्यापर्यंत पोहोचून जास्तीत जास्त क्षयरोगी शोधून काढण्यात यश मिळविले आहे, असे महापालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. वैषाली जाधव यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.