Pune : थकीत पाणीपट्टी न भरल्यास पाणी पुरवठा बंद करण्याचा पुणे महापालिकेचा इशारा

एमपीसी न्यूज – पाणीपट्टी थकविणाऱ्या केंद्र व राज्य सरकारी (Pune) कार्यालये, संस्थांना प्रारंभी नोटीस बजावण्यात येणार आहे. त्यानंतर 31  जानेवारीपर्यंत थकीत पाणीपट्टी न भरल्यास पाणी पुरवठा बंद करण्याचा इशारा पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिला आहे.

 

संबंधित कार्यालये, संस्थांना महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून दरवर्षी पाणीपट्टी भरण्यासंदर्भात नोटीस पाठविली जाते. मात्र सरकारी, निमसरकारी कार्यालये असल्याने त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होण्याची शक्‍यता नसल्याने संबंधित संस्थांकडून पाणीपट्टी भरण्याकडे दुर्लक्ष केले जाते. महापालिका प्रशासनाने मागील वर्षी शासकीय संस्थांकडील थकीत पाणीपट्टी वसूल करण्यासाठी विशेष मोहीमही राबविली होती. मात्र त्यालाही फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता.

Maharashtra : कोरोना उपाययोजनांसाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना

पुणे कँटोन्मेंटकडे बोर्डाकडे 40 कोटी रुपयांची थकबाकी आहे. मागील वर्षी त्यांचा पाणी पुरवठा बंद केल्यानंतर त्यांनी तातडीने दोन कोटी रुपये भरले होते. त्यानंतर उर्वरित थकीत पाणीपट्टी अद्याप भरलेली नाही. याच पद्धतीने अन्य सरकारी संस्थांकडूनही पाणीपट्टी भरण्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे पाणीपट्टी वसूल करण्यासाठी महापालिका प्रशासनाने कडक भूमिका घेण्याचे ठरविले आहे. त्याविषयी आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, ‘‘सरकारी संस्थांकडून पाणीपट्टी भरली जात नाही, त्यांना आता नोटीस बजावली जाईल, त्यानंतरही त्यांनी पैसे भरले नाहीत तर 31 जानेवारीनंतर त्यांचा पाणी पुरवठा बंद केला (Pune) जाईल.’’

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.