Pune : रुग्णांना उपचार नाकारणाऱ्या पुना हॉस्पिटलला पुणे महापालिकेची नोटीस ; 24 तासांत लेखी खुलासा करण्याचे आदेश

Pune Municipal Corporation's notice to Poona Hospital for refusing treatment two patients; Order for written disclosure within 24 hours

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील दोन रुग्णांना उपचार नाकारणाऱ्या सदाशिव पेठेतील पुना हॉस्पिटलला पुणे महापालिकेतर्फे नोटीस बजावण्यात आली आहे. 24 तासांत योग्य त्या कागदपत्रांसह वस्तुस्थितीदर्शक लेखी खुलासा करण्यात यावा, असे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी या नोटिशीत म्हटले आहे.

खुलासा समाधानकारक नसल्यास कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 शासनातर्फे लागू करण्यात आला आहे. दि. 4 जून रोजी दोन रुग्ण पुना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते.

त्यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. तांबोळकर यांनी या रुग्णांना रुग्णालयात दाखल होऊन उपचार करण्यास नकार दिला.अशी तक्रार पुणे महापालिकेला प्राप्त झाली आहे.

त्यानंतर हे दोन्ही रुग्ण रिक्षाने भारती हॉस्पिटल धनकवडी येथे गेले. अश्या तेथे दोघेही उपचारासाठी दाखल झाले आहेत. या दोन्ही रुग्णांना पुना हॉस्पिटलमध्ये सर्वोतोपरी वैद्यकीय तपासणी करून, योग्य ते औषधोपचार अपेक्षित होते. तसेच आपल्या आयसीयूमध्ये गांभीर्याने व व्यवस्था पाहून उपचार करणे आवश्यक होते.

आयसीयू उपलब्ध नसेल तर डॅशबोर्डमध्ये कोठे आयसीयू बेडस उपलब्ध आहे, याची छाननी करून, खात्री करून व पूर्वसूचना देऊन अद्ययावत सुविधा असलेल्या रुग्णवाहिकेतून या रुग्णांना पाठविणे अपेक्षित होते.

मात्र, असे न करता दोन्ही रुग्णांची तपासणी न करता बेजबाबदारपणे रुग्णांना रिक्षात पाठवून दिले. आपले हे कृत्य वैद्यकीय पेशाला लाजिरवाणे असल्याचेही नोटीसीत म्हटले जाते.

दर्म्य, यासंदर्भात पूना हॉस्पिटल प्रशासनाची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. ती मिळाल्यास या बातमीत समाविष्ट केली जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.