Pune : तंबाखूजन्य पदार्थ शाळा, महाविद्यालय परिसरात विकणाऱ्या 173 जणांवर पोलिसांची धडक कारवाई

एमपीसी न्यूज- पुण्यातील शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्या तब्बल 173 जणांवर पोलिसांनी काल सोमवारी (दि 28 जानेवारी) कारवाई केली आहे.

पुण्यातील कित्येक शाळा, महाविद्यालयाच्या परिसरामध्ये सिगरेट, तंबाखू, गुटखा इत्यादी अशा अनेक तंबाखूजन्य पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. शैक्षणिक संस्थांच्या 100 यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास मनाई आहे.

अशा आरोग्यास घातक असलेल्या पदार्थांचे व्यसन विद्यार्थ्यांना लागू नये. तसेच त्यांचे स्वास्थ्य टिकून राहावे, यासाठी पुण्यातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरातील असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या एकूण 173 जणांवर कारवाई करण्यात आली.

गुन्हे शाखेने धडक कारवाई करत पुण्यातील विविध भागांतील शाळा, महाविद्यालयांच्या हद्दीमध्ये तंबाखु जन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यावर कारवाई केली. गेल्या वर्षी (2018) मध्ये देखील अशाच प्रकारे 315 इसमांवर कारवाई करण्यात आली होती. ज्यांच्यावर यापुर्वी कारवाई केलेली आहे अशा इसमांचे पान टपरीचे परवाने रद्द करण्याबाबत पुणे महानगरपालिकेस कळविण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.