Pune : सिंहगड रस्त्यावरील लॉजवर चालणारे सेक्स रॅकेट उघडकीस ; तीन महिलांची सुटका

एमपीसी न्यूज – सिंहगड रस्त्यावर नवले ब्रीजजवऴ असलेल्या स्वागत लॉजवर गुन्हे शाखेच्या सुरक्षा विभागाने सापऴा रचून या ठिकाणी चालू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून तीन महिलांची सुटका केली.

मयंककुमार भगवान पांड (वय 24, रा. बिहार) व शुभम तुफानी सिंह (वय 38, रा. कात्रज,पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

_MPC_DIR_MPU_II

मिऴालेल्या माहितीनुसार, नवले ब्रीजजवऴ असलेल्या स्वागत लॉज येथे वेश्या व्यवसाय चालू असल्याची माहिती पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिऴाली होती. याबद्दलची खात्री केल्यानंतर पोलिसांनी सापऴा रचून लॉजवर छापा टाकला. त्यावेऴी मयंमकुमार व शुभमला ताब्यात घेऊन चौकशी केली असता ते दोघे लॉजमधील कामगार असून गरीब महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे उघडकीस आले.

सिंहगड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.