Pune : पुणे पोलिसांनी जप्त केले 5 कोटी रुपयांचे ड्रग्ज

एमपीसी न्यूज-पुणे पोलिसांनी 5 कोटी रुपयांचे (Pune) एक किलो मेथॅम्फेटामाइन हे ड्रग्ज जप्त केले आहे. मेथॅम्फेटामाइन हा अंमली पदार्थ जलद आणि दीर्घकाळ प्रभाव टिकणारे कृत्रिम औषध, उत्तेजक म्हणून बेकायदेशीरपणे वापरला जातो.
पुणे पोलिसांचे अंमली पदार्थ विरोधी पथक आणि कस्टम विभाग यांच्या संयुक्त कारवाईने या सर्व प्रकरणी चार जणांना अटक केली आहे .
Pune : किरकोळ वादातून तरुणावर शस्त्राने वार
या बद्दल पोलिसांनी अधिक माहिती दिली की, 29 मे रोजी पुण्याजवळील खेड शिवापूर टोल नाक्यावर एका वाहनामधून 850 ग्रॅम मेथॅम्फेटामाइन ड्रग जप्त करण्यात आले. या प्रकरणी सखोल तपास करताना पुणे पोलिसांनी लोणावळ्याजवळ आणखी 200 ग्रॅम मेथॅम्फेटामाइन जप्त केले.नेमके हे अंमली पदार्थ कोणाला विकणार होते आणि कुठून आणले होते (Pune) याचा तपास सुरू आहे.