BNR-HDR-TOP-Mobile

Pune : गणेश विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगाने पुणे पोलिसांचा तगडा बंदोबस्त; बाप्पाला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यासाठी मंडळे सज्ज

एमपीसी न्यूज – दहा दिवसाच्या बाप्पाला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यासाठी पुणे शहरातील मंडळे सज्ज झाली आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनीही गणेश विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगाने पुणे पोलिसांचा तगडा बंदोबस्त आखला आला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून 270 सीसीटीव्ही देखील लावणार आहेत.

गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान पुणे पोलिसांनी काही मार्ग बंद ठेवण्यात येणार असून काही मार्गावरील वाहतूक वळविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक मंडळास केवळ दोन ढोल ताशा पथक परवानगी तर, मानाचे गणपतींना 3 ढोल ताशा पथकास परवानगी दिली आहे.

पुणे पोलिसांचा तगडा बंदोबस्त :
– 4 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 12 पोलीस उपायुक्त, 27 एसीपी (ACP), 150 पोलीस निरीक्षक (PI), 461 सहायक पोलीस निरीक्षक/पोलीस उप निरीक्षक (API/PSI), 7457 पोलीस कर्मचारी, 700 होमगार्ड, 5 वज्र पथक, 2 SRPF कंपनी, 270 सीसीटीव्ही (CCTV).

HB_POST_END_FTR-A2

.