Pune : ‘एल्गार परिषद’ प्रकरणात पुणे पोलीस अमेरीकेच्या ‘एफबीआय’ची मदत घेणार

एमपीसी न्यूज – एल्गार परिषद प्रकरणातील डॅमेज झालेल्या हार्डडिस्कमधील डेटा परत मिळवण्यासाठी पुणे पोलीस अमेरीकेच्या एफबीआयची मदत घेणार आहे. यासाठी पुणे पोलीस आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांचं एक पथक लवकरच अमेरिकेला ही हार्डडिस्क घेऊन जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

एल्गार परिषदेतील आरोपी वरवरा राव याच्या घरातून पुणे पोलिसांनी एक हार्डडिस्क जप्त केली होती. ही हार्डडिस्क ओपन होत नसल्यामुळे पुणे पोलिसांनी यापूर्वी चार वेगवेगळ्या फॉरेन्सिक लॅबची मदत घेतली होती. परंतु यातील माहिती मिळवण्यात त्यांना अपयश आले. त्यामुळे आता ही माहिती मिळवण्यासाठी अमेरीकेच्या एफबीआयची मदत घेण्याचे पोलिसांनी ठरवले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.