BNR-HDR-TOP-Mobile

Pune : बुधवार पेठेत पुणे पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – बुधवार पेठेतील रेड लाईट एरियात आज बुधवारी (दि.16) दुपारी 4 वाजता सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास बावचे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंबिंग ऑपरेशन करण्यात आले. अल्पवयीन, बांग्लादेशी तसेच बेकायदेशीररित्या कोणी राहणार नाही. जर कोणी राहत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी हे कोंबिंग ऑपरेशन करण्यात आले.

काय होती नेमकी कारवाई ?
गेल्या 15 दिवसांपासून पासून बुधवार पेठेतील रेड लाईट परिसरात नाकाबंदी करून येथील लोकांचा सर्वे करून ही कारवाई सुरू आहे. तेथील महिलांचे ओळखपत्र तपासण्यात येत आहेत. आजदेखील त्याचीच फेरतपासणी मोठया प्रमाणात करण्यात आली. ओळखपत्राशिवाय त्यांना इथे राहता येणार नाही. तसेच लवकरात लवकर तेथील महिलांनी ओळखपत्राची नोंदणी करून घ्यावी, असे पोलिसांनी यावेळी सांगितले आहे.

कारवाई मागील नेमका उद्देश काय होता?
या कारवाईचा मुख्य उद्देश म्हणजे याठिकाणी कोणी बांग्लादेशी येऊन येथे राहून कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य करू नये. कोणत्याही अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने या ठिकाणी आणून तिथे ठेवण्यात आले आहे का? हे तपासणे. पोलिसांची भीती घालून कोणाला जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जात नाही ना? तिथे राहणारऱ्यांनी कायदेशीररित्या तेथे राहावे. तेथील महिलांना कोणत्याही प्रकारच्या अत्याचाराला सामोरे जावे लागू नये. तसेच पोलिसांचे आणि त्यांच्यामधील कम्युनिकेशन वाढावेत या सर्व गोष्टींसाठी ही कारवाई करण्यात आली.

आढळल्याची केली कानउघाडणी –
या कारवाई दरम्यान 100 हुन अधिक मुलांना ताब्यात घेऊन त्यांचीही कानउघाडणी करून त्यांना समज देऊन पोलिसांनी त्यांची चांगलीच कानउघाडणी केली.

.

HB_POST_END_FTR-A1
.