Pune : 2023-24 आर्थिक वर्षात पुणे रेल्वे विभागाने कमावले 1213 कोटी रुपयांचे उत्पन्न, उत्पन्नात 18 टक्क्यांनी वाढ

एमपीसी न्यूज –  मागील आर्थिक वर्षात (2023- 24) पुणे विभागातून ( Pune ) तब्बल 56 लाख प्रवाशांनी प्रवास केला असून, यातून 1213 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यापूर्वीच्या वर्षाच्या तुलनेत 18.4 टक्के ही वाढ आहे. पुणे विभागाने आपल्या उद्दिष्टापेक्षा अधिक कामगिरी केली आहे.

Aundh : सुरेंद्र कुडपणे-पाटील यांचे हॉरीझोन चित्रप्रदर्शनाचे औंध येथे उद्घाटन

देशातील ‘ए’ वन दर्जाच्या स्थानकांत पुणे स्थानकाची गणना होते. पुणे विभागात पुणे स्थानकावरूनच सर्वांत जास्त प्रवाशांची वाहतूक होते. यानंतर कोल्हापूर व मिरज स्थानकांचा समावेश आहे. रविवारी मध्यरात्री यात दौंड स्थानकाचा समावेश करण्यात आला. या वर्षी मिळालेले उत्पन्न केवळ प्रवासी वाहतुकीतून मिळाले आहे. यात मालवाहतूक वा अन्य स्त्रोतांतून मिळालेल्या उत्पन्नांचा समावेश नाही.

मागील आर्थिक वर्षात 56 लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे.यातून 1213 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर याकाळात रेल्वेच्या फेऱ्या या 84 हजार 870 मारल्या आहेत.गेल्यावर्षी हेच उत्पन्न 1024 कोटी रुपये होते. तर रेल्वेच्या 77 हजार 178 रेल्वेच्या फेऱ्या झाल्या आहेत. प्रवाश्यांनी रेल्वे प्रवासा पसंती दिली असल्याने रेल्वेच्या उत्पन्नात भर पडली ( Pune ) आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.