-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune: पुणेकरांचे वीज बिल माफ करा; जगदीश मुळीक यांचे मुख्यमंत्री, ऊर्जामंत्र्यांना पत्र

Pune: Pune residents' electricity bill waived; Letter from Jagdish Mulik to Chief Minister, Energy Minister

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे पुणे शहरातील नागरिकांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. विशेषतः श्रमिक, कष्टकरी, झोपडपट्टीत, चाळीत, वाड्यात राहणाऱ्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती अधिक हलाखीची आहे. मध्यमवर्गीय कुटुंबही आर्थिक संकटात आहेत.

या बाबींचा सहानुभूतीने विचार करून गरीब, मध्यमवर्गीय कुटुंबांचे एप्रिल ते जून 2020 या कालावधीचे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून (महावितरण) आकारण्यात येणारे वीज बिल माफ करण्यात यावे, अशी मागणी पुणे शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना या मागणीचे पत्र देण्यात आले आहे.

गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत पथारीवाले, दुकानदार, छोटे उद्योजक, सेवा व्यावसायिक यांचे उद्योग बंद आहेत. लॉकडाउनच्या कालावधीत त्यांना सरासरी बिले देण्यात आली आहेत.

व्यवसाय बंद असल्याने ही बिले भरणे शक्य नाही. अशा सर्व व्यावसायिकांना वीज बिलात मोठी सवलत द्यावी, प्रत्यक्ष तपासणी करून बिले द्यावीत, स्थिर आकार माफ करावा, हप्ते बांधून द्यावेत, अशीही विनंती पत्रात करण्यात आली आहे.

या सूचनांचा विचार करून तातडीने निर्णय घ्यावा. आणि पुणेकरांना दिलासा द्यावा, असे जगदीश मुळीक यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मागील 3 महिन्यांपासून कोरोनामुळे अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य पुणेकर घरातच बसून आहेत, त्यांना वीजबिल माफ करून महाराष्ट्र शासनाने दिलासा देण्याची गरज आहे.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn