Pune  : पुणेकरांनी कोरोनापासून वाचण्यासाठी काळजी घ्यावी : डॉ. रामचंद्र हंकारे

Pune residents should be careful to avoid corona: Dr. Ramchandra Hankare

एमपीसी न्यूज – पुणेकरांनी कोरोनाला घाबरू नये. मास्क, सॅनिटायजर, फिजिकल डिस्टनसिंग पाळावे. वेळीच योग्य उपचार घेतल्यास कोरोना बरा होऊ शकतो, असा विश्वास  पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी व्यक्त केला. 

आज, बुधवारी ‘डॉकटर्स डे’ निमित्त डॉ. हंकारे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी कोरोनाबाबत मनमोळेपणाने उत्तरे दिली. डॉ. हंकारे म्हणाले, ज्या नागरिकांना सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे आढळून येत असतील त्यांनी तातडीने कोरोना चाचणी करून घ्यावी. त्यामुळे वेळीच उपचार करण्यास मदत होते.

सध्या पुणे शहरात 17 हजारांच्यावर  कोरोना रुग्ण  आहेत. त्यामध्ये बरे झालेले तब्बल 10 हजार 451 रुग्ण आहेत. तर, 643 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत  नागरिकांना कोरोना व्यतिरिक्त लठ्ठपणा, मधुमेह, किडनी विकार, हृदयरोग, असे अनेक आजार होते. विशेष म्हणजे जेष्ठ नागरिकांनी अधिक दक्ष राहण्याची गरज असल्याचे डॉ. हंकारे यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, महापौर मुरलीधर मोहोळ आदी  पुणे महापालिका कोरोना बाबत नागरिकांना वारंवार जागरूक करीत आहेत. या सर्वांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

तसेच सार्वजनिक, खाजगी कार्यालयात, सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना मास्क घालणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सक्तीचे केले आहे. अन्यथा 500 रुपये दंड आणि पोलीस कारवाईला सामोरे जावे लागू शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

कोरोनाला दूर ठेवण्यासाठी नागरिकांनी मास्क घालावा, वारंवार हात स्वच्छ धुणे गरजेचे असल्याचे डॉ. हंकारे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like