Pune : जिल्ह्यातील 1105 गुंडांवर पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई; काही तडीपार तर काहींना ‘मोक्का’

Pune Rural Police cracks down on 1105 goons in the district पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दोन वर्षाच्या कालावधीत पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी विशेष प्रयत्न केले

एमपीसी​ न्यूज ​- जुलै 2018 मध्ये पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पुणे जिल्ह्याचा पदभार स्वीकारला होता. त्यांचा दोन वर्षाचा कालावधी पूर्ण झाला. या दोन वर्षाच्या कालावधीत त्यांनी पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्या दोन वर्षात त्यांनी पुणे जिल्ह्यासाठी धोकादायक ठरू पाहणाऱ्या 1105 गुंडावर कारवाई केली. यातील काहीना तडीपार केले तर काहींवर मोक्का अंतर्गत कारवाई केली. 

_MPC_DIR_MPU_II

मागील दोन वर्षात पुण्याच्या ग्रामीण भागातील 66 गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठवून त्यातील 444 गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली.

जिल्ह्यातील 148 गुन्हेगारी टोळ्यांची माहिती एकत्र करून त्यातील 661 गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून तडीपार केले. इतक्या मोठ्या संख्येने गुन्हेगारांवर कारवाई केल्यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीला काही प्रमाणात आळा बसला.

जिल्ह्यातील अजूनही काही ही गुणकारी फुलांवर ग्रामीण पोलिसांचे बारकाईने लक्ष असून त्यांच्यावरही मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे ग्रामीण पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले. पुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने गुन्हेगारी टोळ्यांचे रेकॉर्ड तपासून त्यांच्यावर असलेल्या गंभीर गुन्ह्यांची नोंद घेऊन महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायदा नुसार (मोक्का) कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पोलिसांच्या या कारवाईमुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गॅंग ​वॉर, औद्योगिक परिसरात दहशत निर्माण करणे, गुन्हेगारी टोळीच्या सहाय्याने गंभीर गुन्हे करणे, यासारख्या गुन्ह्यात घट झाल्याचेही ग्रामीण पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1