Pune : पुणे हादरले ! प्रेयसीकडून प्रियकराचा चाकूने वार करून खून

एमपीसी न्यूज- पुणे जिल्ह्यातील वाघोलीत प्रेम प्रकरणातून ( Pune ) प्रेयसीने प्रियकराचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आज सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. वाघोली परिसरात एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये हे दोघेही मागील काही महिन्यांपासून राहत होते. दोघांमध्येही प्रेम संबंध होते. मात्र आज पहाटेच्या सुमारास रक्ताच्या थारोळ्यात प्रियकराचा मृतदेह सापडला आहे.