_MPC_DIR_MPU_III

Pune – सायकलींचे पुणे शहर ही ओळख पुन्हा व्हावी : महापौर मुरलीधर मोहोळ

एमपीसी न्यूज – सायकलींचे शहर ही पुण्याची ओळख तशी जुनीच आहे. पण मधल्या काळात ही ओळख पुसली गेली होती. मात्र, आता पुण्याची ओळख पुन्हा सायकलींचे पुणे शहर अशी व्हावी, याकरिता पुणे मनपाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

नागरिकांकडून सायकल वापरात वाढ व्हावी, यासाठी मनपा धोरणानुसार महापालिकेत सायकल क्लब सुरू करण्यात आलेला आहे. सायकल चालविण्यास प्रोत्साहन मिळावे, हा खरा संदेश देण्याचा उद्देश आहे. सायकल क्लबच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. सायकल वापरास प्रोत्साहन देण्यासाठी अनेक ठिकाणी सायकल ट्रॅकचे काम चालू आहे. पुण्याचे पर्यावरण संतुलन व आरोग्यदायी वातावरणात वाढ होण्याच्या दृष्टीने हा उपक्रम असल्याचेही त्यांनी सांगितले.

उपमहापौर सरस्वती शेंडगे म्हणाल्या की, पुणे शहर प्रदूषणमुक्त करण्याकरिता मनपाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. पर्यावरण संतुलन राखण्याकरिता जास्तीत जास्त नागरिकांनी सायकल चालवावी असे त्यांनी याप्रसंगी आवाहन केले. शनिवारवाडा ते पुणे मनपा मुख्य भवनापर्यंत महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सुरेश परदेशी, मंगेश दिघे व अन्य अधिकारी कर्मचारी यांनी मनपा मुख्य भवनापर्यंत सोमवारी सायकल चालवली.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.