Pune : पुणे – सोलापूर इंटरसिटी एक्सप्रेस 21 डिसेंबरपासून तीन महिने फक्त शनिवारी रद्द

एमपीसी न्यूज- पुणे ते सोलापूर दरम्यान धावणारी इंटरसिटी एक्सप्रेस (गाडी क्र 12169/12170) 21 डिसेंबरपासून पुढील तीन महिने दर शनिवारी रद्द करण्यात आलेली आहे अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

दौंड ते सोलापूर दरम्यान रेल्वेच्या दुरुस्ती देखभाल कामासाठी ही गाडी 21 डिसेंबर 2019 ते 28 मार्च 2020 या कालावधीमध्ये आठवड्यातून फक्त शनिवारी रद्द करण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पुणे ते सोलापूर दरम्यान धावणारी डेमू (गाडी क्र 71415 ) 21 डिसेंबर 2019 ते 28 मार्च 2020 या कालावधीमध्ये प्रत्येक शनिवारी फक्त पुणे ते भिगवण दरम्यान धावेल. आठवड्यातील इतर दिवशी ही गाडी नेहमीप्रमाणे आपल्या वेळेनुसार धावणार आहे.

त्याचप्रमाणे सोलापूर ते पुणे दरम्यान धावणारी डेमू (गाडी क्र 71414 ) 21 डिसेंबर 2019 ते 28 मार्च 2020 या कालावधीमध्ये प्रत्येक शनिवारी फक्त सोलापूर ते कुर्डूवाडी दरम्यान धावेल. आठवड्यातील इतर दिवशी ही गाडी नेहमीप्रमाणे आपल्या वेळेनुसार धावणार आहे. तरी प्रवाशांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.