Pune : पुणे सोलापूर इंटरसिटी एक्स्प्रेस डिसेंबरमध्ये रद्द

एमपीसी न्यूज – सोलापूर रेल्वे मंडळातील भिगवण आणि वडशिंगे रेल्वे स्थानकांच्या दरम्यान डिसेंबर महिन्यात दररोज दोन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे-सोलापूर (12169), सोलापूर -पुणे (12170) इंटरसिटी ही रेल्वे 3 डिसेंबर 2018 ते 1 जानेवारी 2019 दरम्यान रद्द करण्यात आली आहे. त्याचबरोबर अन्य पाच गाड्या याच कालावधीत यामुळे प्रभावित होणार आहेत.

आठवड्यातून तीन दिवस चालणारी हैद्राबाद- पुणे (17014) 4 डिसेंबर ते 1 जानेवारी आणि पुणे-हैद्राबाद (17013) गाडी 5 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत कुर्डुवाडी-हैद्राबाद या दरम्यान धावणार आहे. कुर्डुवाडी ते पुणे दरम्यान ही गाडी रद्द करण्यात आली आहे.

लोकमान्य टिलक टर्मिनस – विशाखापट्टनम एक्सप्रेस (18520), अहमदाबाद- यशवंतपूर एक्सप्रेस (16501) आणि पुणे- भुवनेश्वर एक्सप्रेस (22881) या गाड्या 2 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान अर्धा तास उशिरा धावणार आहेत. वरील बदल लक्षात घेऊन प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे विभागाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.