Pune : शिक्षण संस्थेस अनुकूल शेरा देण्यासाठी 50 हजारांची लाच स्वीकारणारा एसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – शिक्षण संस्थेस अनुकूल शेरा देण्यासाठी 50 हजारांची लाच स्वीकारणाऱ्यास आज बुधवारी (दि.30) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी एका 50 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली होती.

संशोधन सहायक, प्राथमिक शिक्षण संचानालय येथे कार्यरत असलेले निजाम हाजी नन्हुमिया शेख (वय 36, रा. हांडेवाडी, हडपसर) असे लाच स्वीकारणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे पार्वती बाई अपंग शिक्षण आणि प्रसारक मंडळ, या संस्थेचे अध्यक्ष असून या संस्थेने संस्थेचे शिक्षक योगेश महाजन यांचेवर कारवाई केली आहे.

योगेश महाजन यांनी प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांचे कार्यालयात संस्थेची आरटीई (राईट टू एज्युकेशन) मान्यता रद्द करण्यासाठी तक्रार अर्ज केला होता. यावर शेख यांनी या अर्जावर कारवाई सुरू केली होती.

महाजन यांचे अर्जावर कारवाई न करण्यासाठी आणि आरटीई मान्यतेसाठी संस्थेस अनुकूल शेरे देण्यासाठी शेख यांनी काल 50 हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली असता या तक्रारीची चौकशी करून लाच स्वीकारताना शेख यांना आज 50 हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय भापकर, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक सुरेखा घार्गे यांच्या सापळा पथकाने केली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेखा घार्गे करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'87523e1d882261cd',t:'MTcxMzI1MDI0NC41NTMwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();