_MPC_DIR_MPU_III

Pune : पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वर्धापनदिनिमित्त छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन

एमपीसी न्यूज – पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या 80 व्या वर्धापनदिनिमित्त छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ छायाचित्रकार वसंत प्रभू यांच्या हस्ते हा प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. विविध वृत्तपत्रांत काम करणाऱ्या छायाचित्रकारांनी कामादरम्यान काढलेली ही छायाचित्रे आहेत. बालगंधर्व कलादालन येथे 15 ते 17 डिसेंबर या कालावधीत सकाळी 10 ते 6 या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहील.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

वसंत प्रभू यांनी 1992 मध्ये द इंडिअन एक्सप्रेस वृत्तपत्रात डार्करूम विभागात काम करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी छायाचित्रण कला अवगत केली. तेथूनच त्यांनी मुख्य छायाचित्रकार म्हणून काम केले आणि सेवानिवृत्त झाले. 26/11 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी ताज हॉटेलमध्ये जाऊन प्राणाची पर्वा न करता छायाचित्रे काढली होती.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.