Pune पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये आता पेट्रोल-डिझेल बंदी : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

एमपीसी न्यूज – राज्यात संचारबंदी लागू असतानाही विनाकारण नागरिक बाहेर पडत आहेत. त्यामुळे प्रशासनाने आणखी कठोर निर्णय घेतला असून, आता सर्वसामान्य पुणेकरांना पेट्रोल – डिझेल मिळणार नाही. अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांनाच मिळणार पेट्रोल, डिझेल मिळणार असल्याचे जाहीर केले आहे.

याबाबत जिल्हाधिकरी नवल किशोर राम यांनी आज ( मंगळवारी ) आदेश जारी केले आहेत. या आदेशाची आज रात्रीपासूनच अंमलबजावणी होणार आहे. या आदेशानुसार आता अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच पेट्रोल किंवा डिझेल मिळणार आहे. सर्वसामान्य नागिकांना पेट्रोल व डिझेल मिळणार नाही. तसेच त्यांना एकदाच पेट्रोल व डिझेलची टाकी फुल करून घ्यावी लागणार आहे.

तसेच ज्या नागरिकांना इंधन आवश्यक असेल, त्यांना तसे कारण द्यावे लागणार आहे, असे स्पष्ट आदेश पुणे जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

म्यान, अत्यावश्यक सेवेवर कार्यरत असणारे सर्व अधिकारी कर्मचारी, कोरोना नियंत्रण व निर्मूलनासाठी कार्य करणाऱ्या खाजगी व्यक्ती, अत्यावश्यक वस्तू व सेवा संदर्भात कार्य करणारी खाजगी व्यक्ती, वैद्यकीय उपचार किंवा सहाय्याची गरज असणारी व्यक्ती या चार प्रकारच्या वाहनांना यातून सूट देण्यात आली आहे. मात्र, सूट देण्यात आलेल्या व्यक्तीने एकदाच वाहनाची टाकी पूर्ण भरून घेणे बंधनकारक आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारी अन्नधान्य वितरण अधिकारी हे या बाबीवर लक्ष ठेवणार आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.