Pune : पुणे अपघात प्रकरणातील दोषींना सोडणार नाही; वडेट्टीवार यांचे पुणेकरांना वचन

एमपीसी न्यूज : – पुणे सांस्कृतिक, शैक्षणिक नगरी आहे.देशातून(Pune) शिक्षणासाठी येणाऱ्या मुलांना पुणे शहर सुरक्षित शहर वाटते. निवृत्तीनंतर पुण्यात स्थायिक व्हावे, असे अनेकांना वाटते. पण आता पुणे असुरक्षित वाटायला लागले आहे. पुण्यातील कार अपघात प्रकरणी आमचे आमदार धंगेकर पुढे आले त्यांनी प्रकरण लावून लावले. या अपघात प्रकरणी कोणी दोषी असेल त्यावर कारवाई झाली पाहिजे.

विरोधी पक्षनेता आणि नागरिक म्हणून तुमच्या सोबत आहे (Pune)असा पुणेकरांना विश्वास देत या अपघात प्रकरणी न्यायिक चौकशी आम्ही मागणी केली असून दोषींना सोडणार नाही असे वचन श्री. वडेट्टीवार यांनी पुणेकरांना दिले. दोन निष्पाप जीव गेले आहेत. याचे दुःख मोठे आहे. आता सरकार बदलण्याची वेळ आली. एकाला बदलून उपयोग काय? सगळ्यांनी लुटण्याचे काम या सरकारने केले. एकाला बाजूला करून काय होणार नाही. आता महायुती बाजूला केली पाहिजे, अशा शब्दात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल बोल केला.

आज संतप्त पुणेकरांनी ‘असुरक्षित पुणे कोणामुळे’ हा संवाद आयोजित केला होता. पुणे बचाव समिती कार्यक्रमाचे आयोजक होते. या कार्यक्रमात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात श्री. वडेट्टीवार यांनी खडे बोल सुनावले. त्याच बरोबर माध्यमांशी बोलताना सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले.

श्री. वडेट्टीवार म्हणाले की, राजकारणी म्हणून घ्यायला लाज वाटते अशी परिस्थिती सत्ताधाऱ्यांनी करून ठेवली आहे. आधी जो आदर होता आता तो राहिला नाही.कारण सत्तेचा चुकीच्या पद्धतीने वापर झाला. पोर्शे कार अपघात प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होता. यावर आक्षेप घेत आमचे आमदार धंगेकर यांनी वस्तुस्थिती मांडली. गुन्हेगार शिक्षा झाली पाहिजे. त्यांना वाचवणाऱ्याना शिक्षा झाली पाहिजे.आरोपी श्रीमंत आहे तेव्हा त्याला वाचवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्यावर कारवाई झाली पाहिजे. या घटेनमागे राजकीय दबाव होता. त्याचे पुरावे आहेत. घटना घडते आणि पोलिस सुस्त होते. गुन्ह्याची नोंद नीट होत नाही. रक्ताचे नमुने बदलले जातात. सगळ प्रकरण संशय निर्माण करणारे आहे. डॉक्टर, पोलिस दोषी आहेत.

पल्लवी सापळे भ्रष्टाचाराच्या सापळ्यात आहेत. त्यांना साफसफाई करायला पाठवले आहे. घटना घडेपर्यंत कारवाई होत नाही. कुणाचा फोन होता. कोणी फोन केला. त्याला सहआरोपी केले पाहिजे.

चौकशी करायला येता आणि बिर्याणी मागवता. ही चौकशी आहे का? या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वागण्याची अपेक्षा होती. पोलिस आयुक्त आल्यावर त्यांनी गुंडांची परेड केली. फक्त दिखावा केला.

Alandi : आषाढी वारीनिमित्त जिल्हाधिकारी यांचा आळंदी पाहणी दौरा !

श्री. वडेट्टीवार म्हणाले की, पुणे विद्यापीठात गांजा सापडला. पुणे पोलिस आयुक्तालय मध्ये दारू बाटल्या सापडल्या. तीन महिने नंबर नसलेली कर पुणे रस्त्यावर फिरत होती. तरी देखील कारवाई नाही. कारण इथल्या पोलीस आयुक्तांचा वचक नाही. सरकारमध्ये बदल्यांचा भ्रष्टाचार आहे. २०२३ मध्ये डॉ. तावरे यांची बदली करावी असा, अहवाल होता.तरी तावरे बदली झाली नाही. किडनी, ड्रग प्रकरणात त्यांचे नाव आले. तरी बदली केली नाही. ससूनची पार वाट लावली आहे.

पुण्याचा रिंग रोड होतोय. टेंडर 42 ते 49 टक्केच्या वर दिले आहे. त्यात भांडण सुरू आहे. टक्केवारीत सगळे अडकले आहेत. चार तारखेचा निकाल हाच आता न्याय असणार आहे. पुणेकर जे करतात ते महाराष्ट्र करतो. आता न्यायचे राज्य राहिले नाही. सत्तेचा मुकुट कोणी कायमचा घेऊन येत नाही. पुणेकरांना विनंती आहे. काही झालं तर रस्त्यावर या. जाब विचारा, असे आवाहन देखील श्री. वडेट्टीवार यांनी पुणेकरांना केले आहे.

 

 

 

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share