Pune : पुणेकरांना अनुभविता येणार पौराणिक दशावतारी संगीत नाटक

एमपीसी न्यूज – पुण्यातील (Pune) तात्यासाहेब नातू फाउंडेशनच्या वतीने येत्या शनिवारी (दि. 17) टिळक स्मारक मंदिर येथे सायं 5 वाजता कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण लोककला म्हणून प्रसिद्ध असलेल्या पौराणिक दशावतारी संगीत नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.

सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार भावार्थ देखणे हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर तो देण्यात येईल. सभागृहातील काही जागा निमंत्रितांसाठी राखीव असतील याची कृपया नोंद घ्यावी.

या संदर्भात अधिक माहिती देताना तात्यासाहेब नातू फाउंडेशन मुख्य विश्वस्त शारंग नातू म्हणाले, “दशावतार हा कोकणाला लाभलेला पारंपरिक समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे. इतकेच नव्हे तर दशावतार हा कोकणी माणसांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. या दशावताराचा अनुभव पुणेकरांनाही घेता यावा या उद्देशाने आम्ही या संगीत नाटकाचे आयोजन केले आहे.”

Pune : अभिव्यक्ती स्वातंत्र्य व लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या भाजपाच्या गुंडांवर पोलीसांनी कडक कारवाई करावी – अरविंद शिंदे

या दशावतारी संगीत नाटकामध्ये रामभक्त (Pune) जांबुवंत या कथेचे सादरीकरण करण्यात येणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, दोडामार्ग येथील नाईक दशावतार नाट्यमंडळातील कलाकार हे सादरीकरण करतील, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.