Pune : पुणेकरांनी स्वत:हून चाचणीसाठी पुढे यावे -महापौर, नायडू रुग्णालयात येण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – मागील तीन दिवसांत ‘कोरोना’चे रुग्ण पुण्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यात पाच नागरिकांचा मृत्यू झाला. त्यामुळे ज्या नागरिकांना सर्दी, खोकला, ताप, कोरोनाची लक्षणे असतील, त्यांनी महापालिकेच्या नायडू रुग्णालयात चाचणीसाठी येण्याचे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.

पुण्यात 83, तर जिल्ह्यात कोरोनाचे 103 रुग्ण झाले आहेत. शहरात पाचवा कोरोनाचा बळी गेला, ही दुर्दैवी घटना आहे. सर्वच प्रशासकीय यंत्रणा कोरोनाला रोखण्यासाठी युद्धपातळीवर काम करीत आहे. आता झोपडपट्टीतही रुग्ण आढळून येत असल्याने चिंता आहे.

पुणेकरांनी स्वतः दक्ष राहिले पाहिजे. मृत्यू होणाऱ्या नागरिकांना आधीपासून काहीतरी आजार होता. नंतर कोरोनाची लागण झाली. त्यात या लोकांचा मृत्यू झाला. थोडी सुद्धा लक्षणे आढळून येत असतील तर नायडू हॉस्पिटलमध्ये चाचणी करून घ्या, लोकडाऊनच्या काळात सोशल डिस्टन्स खूप महत्वाचे आहे.  भाजीपाला खरेदीसाठी 15 क्षेत्रीय कार्यलाय अंतर्गत केंद्र सुरू केले, असेही महापौर म्हणाले.

तीन दिवसांत कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मुंबई नंतर पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. आपण बफर झोन केले आहे. निर्जुजंतुकीकरण करतोय, नायडू रुग्णालयात जेवढे लोक येतायत तेवढ्या लोकांचा सॅम्पल घेण्यात येत असल्याचे महापौरांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.