Pune : पुणेकर आज अनुभवतायेत ऊन-पावसाचा खेळ

एमपीसी न्यूज – पुणेकर आज सकाळपासूनच ऊन पावसाचा खेळ अनुभवत आहेत. रविवारी, सोमवारी रात्री, मंगळवारी आणि बुधवारी पावसाची पुण्यात जोरदार बॅटिंग सुरू आहे. उद्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीवरही पावसाचे संकट गडद असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

मंगळवारी झालेल्या पावसामुळे येरवडा, हडपसर भागांतील झोपडपट्टयात पाणी घुसले. पावसाचे पाणी रस्त्यांवर आल्याने दुचाकीधारकांचे हाल झाले. आज सकाळपासूनच काही भागांत पाऊस होतोय, तर काही ठिकाणी ऊन पडतेय, असा विचित्र अनुभव पुणेकर घेत आहेत.

_MPC_DIR_MPU_II

कोथरूड, यसयनडीटी कॉलेज, प्रभात रस्ता, डेक्कन, बालगंधर्व चौक परिसरात आज दुपारी 2 वा. पाऊस सुरू होता. तर, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ऊन पडले होते.

मागील 4 दिवसांपासून दमदार होत असलेल्या पावसामुळे पुणे शहरातील रस्त्यांची वाट लागली आहे. रस्त्यांवर मोठया प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने अपघातात वाढ होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.