Pune: जमावबंदी असतानाही पुणेकर रस्त्यावर?

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार केवळ रविवारीच जनता कर्फ्यू पाळण्यात आला. राज्य शासनाने जमावबंदी लागू केलेली असताना आज (सोमवारी) सकाळपासूनच पुणेकरांनी रस्त्यावर येण्यास मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.  पुण्यातील सर्व दुकाने व कार्यालये बंद आहेत. तरीही, हे नागरिक का फिरतात, याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

कोरोनाला हद्दपार करण्यासाठी पुणेकरांनी घरीच थांबण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, त्याकडे काही अतिउत्साही पुणेकरांनी दुर्लक्ष केले आहे. नागरिकांनी आपल्या खाजगी वाहनांचा वापर सुरू केला आहे. पुण्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घरीच बसून राहण्याचे आवाहन शासनाने केले आहे. आपल्या कुटुंबीयांसाठी ही बाब आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे.

HB_POST_END_FTR-A2
You might also like