Pune : पुणेकरांनी काळजी घेण्याची गरज -मुरलीधर मोहोळ

एमपीसी न्यूज – पुण्यात कोरोनामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे, ही चिंतेची बाब आहे. पुणेकरांनी काळजी घ्यावी, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.

यापूर्वी 9 रुग्ण बरे घरी होऊन गेले आहेत. आजही 5 लोक घरी सोडले जातील. तशी परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र, झोपडपट्टीतही ‘कोरोना’चे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे पुणेकरांनी काळजी घ्यावी, असे आवाहन महापौर यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.