Pune: महापौर काळजी घ्या, लवकर बरे व्हा!, पुणेकरांनी व्यक्त केल्या भावना

Pune: Punekars Expressed Emotions for Mayor Murlidhar Mohol says Mayor take care, get well soon महापौर मोहोळ पुण्याच्या कोरोनाविरुद्धच्या लढाईत सुरुवातीपासूनच आघाडीवर आहेत. पुणे महापालिका हद्दीत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांनी वेळोवेळी महत्त्वाचे निर्णय घेतले.

एमपीसी न्यूज- पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोना झाल्याची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर पुणेकरांनी सोशल मीडियावर भावना व्यक्त करत महापौर काळजी घ्या, लवकर बरे व्हा, असा संदेश दिला आहे.

महापौर मोहोळ पुण्याच्या कोरोनाविरुद्धच्या लढाईत सुरुवातीपासूनच आघाडीवर आहेत. पुणे महापालिका हद्दीत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांनी वेळोवेळी महत्त्वाचे निर्णय घेतले.

लॉकडाऊन, कंटेन्मेंट झोन, रुग्णांवरील उपचार याबाबत सरकारच्या आणि महापालिकेच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी त्यांचे प्रयत्न राहिले. खुद्द उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीही मोहोळ यांच्या कामाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समोरच कौतुक केले आहे.

महापौर मोहोळ हे कोरोना झाल्याचे समजल्यानंतर रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. या दरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून स्थितीचा आढावा घेत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तर, महापौर आपण लवकरच बरे व्हाल, नियमित औषधोपचार व आहार घ्या, काळजी करू नका, असा सल्ला खासदार गिरीश बापट यांनी दिला आहे.

येतील वादळे, खेटेल तुफान तरी वाट चालतो,
अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही !
अण्णा, मुळशीच्या मातीतला एक लढवय्या पैलवान. संघर्ष करूनच आजवर ते इथंपर्यंत पोहोचले आहेत. कमालीची जिद्द, चिवट चिकाटी, जबाबदारीचं भान आणि अतिशय संयतपणे वाटचाल सुरू असताना कोरोनाचा अडथळा अण्णांना थांबू शकणार नाही.

आम्हा मानकर कुटूंबीयांसह समस्त पुणेकरांच्या भावना आणि सदिच्छा अण्णांसोबत आहेत. अण्णा, Get Well Soon ! अशा शब्दांत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक दीपक मानकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

महापौर कोरोनावर मात करून पुणेकर नागरिकांच्या सेवेत रुजू होतील, यात मला काही शंका नाही. लवकर बरे व्हा, असे नगरसेवक विशाल तांबे यांनी म्हटले आहे.

याशिवाय भाजपचे नगरसेवक, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, पत्रकार, शहरातील अनेक मान्यवरांनी महापौरांना बरे होण्याचे आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.