Pune : पुणेकरांना ‘मिळकतकर’ ऑनलाइन भरण्याचे विलास कानडे यांचे आवाहन

एमपीसी न्यूज – पुणे शहरात ‘कोरोना’चे संकट गंभीर होत असल्याने ‘मिळकत करा’ची छापील बिल पुणेकरांना पाठविणे शक्य होणार नाही. 2020 – 21 चे बिले ‘एसएमएस आणि इ-मेल’द्वारे पाठविण्यात येत आहेत. त्यामुळे ऑनलाइन बिल भरण्याचे आवाहन महापालिकेच्या कर विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी केले आहे.

पुणे महापालिकेला मिळकत करातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. दि. 31 मे पर्यंत हा कर भरल्यास 5 ते 10 टक्के सवलत देण्यात येणार आहे. पुणे शहरातील सर्व मिळकतींची बिले संकेतस्थळावर टाकण्यात आली आहे.

महापालिकेकडे सुमारे 9 लाख मिळकत धारकांचे मोबाईल क्रमांक आहेत. तर, 75 लाख मिळकतधारकांचे इमेल आहेत. दरम्यान, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी मिळकत कराचे उत्पन्न वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात भर दिला आहे. मात्र, कोरोनामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.