Pune : ‘जनता कर्फ्यु’ यशस्वीतेसाठी महापालिकेच्या प्रयत्नाला पुणेकरांचा स्वयंस्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जाहीर केलेला ‘जनता कर्फ्यु’ 100 टक्के यशस्वी करण्यासाठी पुणे महापालिकेने प्रयत्न केले. त्याला पुणेकरांनीही स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद दिला.

या कर्फ्यूची अंमलबजावणी शहरात काटेकोरपणे व्हावी, यासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन प्रत्येक स्तरावर आवश्यक त्या सर्व तयारीनिशी कार्यरत होते. मात्र, प्रामाणिकपणे व स्वयंशिस्तीने नागरिकांनी या कर्फ्यू दरम्यान दिलेल्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन केल्याने कोणत्याही प्रकारची कारवाई करण्याची वेळ आली नाही. शहरातील रस्त्यांवर आज कमालीची शांतता हाती.

पुणे महानगरपालिकेतर्फे ‘जनता कर्फ्यू’चे शहरातील विविध भागांमध्ये ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यात आले. चित्रीकरणाचा व्हिडीओ महानगरपालिकेच्या सोशल मीडिया चॅनल्सद्वारे नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आला. काही तासांतच हा व्हिडीओ जवळपास साडे तीन लाख लोकांपर्यंत पोहोचला. या व्हिडीओमध्ये पुणे शहराचे विहंगम दृश्य पाहायला मिळाले.

मनपाच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अगरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख राहुल जगताप, प्रणव चित्ते, पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे यांनी याकरिता विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.