Pune News : कबुतरांना धान्य खायला घातल्यास होणार दंडात्मक कारवाई

पुणे महापालिका आकारणार 500 रूपयांचा दंड

एमपीसी न्यूज : अनेकांना कबुतरांना धान्य टाकण्याची सवय असते. मात्र असे करणाऱ्यांना यापुढे दंड बसणार आहे.  पुणे महापालिकेने  यासंदर्भात निर्णय घेतला आहे.(Pune News) त्यामुळे आता कबुतर किंवा पारव्यांना धान्य चारणाऱ्या पक्षीप्रेमींना किमान 500 रुपयांचा भुर्दंड पडू शकतो. कबुतरांच्या विष्ठेतून विविध प्रकारचे गंभीर आजार होऊ शकतात. त्या पार्शवभूमीवर महापालिकेकडून कारवाईचा बडगा उगारला आहे.

पुणे महापालिकेने तसे आदेशच काढले आहेत. पुण्यामध्ये अनेक ठिकाणी लोक कबुतरांना धान्य टाकताना आढळतात. त्यामुळे शहरातील कबुतरांची संख्या प्रचंड वाढली आहे. या कबुतरांमुळे मानवी स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कबुतरांच्या विष्ठेतून विविध प्रकारचे गंभीर आजार होऊ शकतात. असे असतानादेखील पक्षीाप्रेमी नागरिक भूतदया दाखवत कबुतरांना धान्य खायला घालतात. वारंवार आवाहन करू नये हे प्रकार थांबत नाहीत. त्यामुळे महापालिकेने अशा नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. कबुतरांना धान्य टाकताना आढळल्यास किमान पाचशे रुपये दंड वसूल केला जाणार आहे.

 

Pimpri News : महापालिका प्रशासकांची सर्वसाधारण सभा नागरिकांसाठी खुली करा –  अजित गव्हाणे

“कबुतराच्या विष्ठेतून जीवाणूंचा प्रसार होऊ शकतो. निसर्गात प्रत्येत प्राण्याच्या आतड्यामध्ये जीवाणू असतात. ते दुसऱ्या प्राण्यांसाठी घातक ठरू शकतात. (Pune News) त्यांच्या विष्ठेमध्ये असलेल्या विषाणूमुळे ऍलर्जी असणाऱ्यांना त्रास होऊ शकतो. यामुळे आजार वाढण्याची शक्यता असते. कबुतरामुळे उद्भवलेला प्रश्न त्रासदायक आहे.

 

मनपा सहायक आयुक्तांना देखील या संदर्भात पत्र दिले आहे. कबुतरांच्या ढाबळी नष्ट करुन त्याच्यावर औषध फवारणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच कबुतरांना दाणे टाकणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड आकारण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. लेखी आदेश देऊन या सूचना देण्यात आल्या आहेत. पाळीव प्राण्यांनी रस्त्यावर विष्ठा केल्यासही दंड आकारला जातो. त्याच धर्तीवर या सूचना देण्यात आल्या आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.