Pune : पादचारी महिलेस धक्का देऊन 34 हजारांची पर्स लांबविली.

एमपीसी न्यूज – पादचारी महिलेस धक्का देऊन दुचाकीवरील चोरट्यांनी पर्स चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि. 5) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास कोंढवा येथील एनआयबीएम रोड येथे घडली.याप्रकरणी कोंढवा येथे राहणाऱ्या एका 36 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या सायंकाळी कोंढवा येथील एनआयबीएम रोडवर निवेदिता बिल्डिंगच्या समोर वॉकिंग करत असताना दुचाकीवरून दोन अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले. दरम्यान त्यांनी फिर्यादी महिलेला धक्का देऊन त्यांची पर्स जबरदस्तीने चोरून नेली. फिर्यादी यांच्या पर्समध्ये दोन सोन्याच्या अंगठ्या, एक मोबाईल आणि रोकड असा एकूण 34 हजार 50 रुपये किमतीचा ऐवज होता.
याप्रकरणी दुचाकीवरील दोन अनोळखी इसमां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.