Pune : शहरातील माजी मंत्री कुटुंबियांसह क्वारंटाइन

Quarantine with the family of a former minister in the city

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील एक माजी मंत्री कुटुंबियांसह क्वारंटाइन झाले आहेत. या मंत्र्यांच्या घरातील नगरसेवकालाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे इतर लोकप्रतिनिधींनी सावध होण्याची गरज निर्माण झाली आहे.

यामुळे या मंत्र्यांचे संपूर्ण कुटुंब क्वारंटाइन करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी या नगरसेवकाने पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हजेरी लावली होती. त्यावेळी 90 पेक्षा जास्त नगरसेवक उपस्थित होते. त्यामुळे इतर नगरसेवकांमध्येही घबराट निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे त्या दिवशी सभा लवकर तहकूब करण्याच्या मनस्थितीत महापौर असतानाही विरोधी पक्षांचे गटनेते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

मात्र, महापौरांनी तातडीने हस्तक्षेप करीत सभा तहकूब केली. त्यावेळी सभागृहात आणि आसपास 200 जण उपस्थित होते.

पुणे महापालिकेच्या नगरसेवकांना झपाट्याने कोरोनाची लागण होत आहे. विशेष म्हणजे ज्या मंत्र्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यांनी सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.

पुणे शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. चाचण्या वाढविण्यात येत असल्याने पॉझिटिव्ह रुग्ण समोर येत आहे.

या कालावधीत या माजी मंत्री महोदयांनी गरजू नागरिकांना अन्नधान्य वाटप असे सामाजिक उपक्रम राबविले आहेत. शहरात आता कोरोनाचे साडे बारा हजारांच्या पुढे रुग्ण आहेत.

तर, 500 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे इतर लोकप्रतिनिधींनी सावध होण्याची गरज निर्माण झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.