Pune : विज्ञान परिषद, इन्स्टिटयूशन ऑफ इंजिनीअर्सतर्फे मंगळवारी बी. जे. वाळिंबे स्मृती व्याख्यानमाला

एमपीसी न्यूज – मराठी विज्ञान परिषद पुणे आणि दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने सहाव्या बी. जे. वाळिंबे स्मृती
व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (दि. 12) संध्याकाळी सव्वासहा वाजता वाजता शिवाजीनगर येथील दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्सच्या फिरोदिया सभागृहात ही व्याख्यानमाला होणार आहे.

सर्वांसाठी ही व्याख्यानमाला खुली आहे. कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे हे ‘स्वच्छ भारत मिशनमध्ये कराडची यशोगाथा’ यावर, तर
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर ‘जिओथर्मल ऊर्जा’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत.

बी. जी. वाळींबे यांनी अभियांत्रिकीच्या ज्ञानाचा वापर करून समाजसेवेचे कार्य केले. त्याच्या कार्याचे स्मरण म्हणून ही व्याख्यानमाला सुरु करण्यात आली असल्याचे मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार सराफ यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.