Pune : पूर्वीप्रमाणे रेडियम व्यवसायिकांना रेडियम बसवण्याची परवानगी द्यावी – राहुल बनकर

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्यातील रेडियम व्यवसायिक पूर्वीपासूनच नंबरप्लेट बसवण्याचा व्यवसाय करत आहेत. १ एप्रिल २०१९ च्या सरकारच्या आदेशानुसार हायसेक्युरिटी नंबरप्लेट शोरूममधून बसवणे बंधनकारक आहे. हायसेक्युरिटी आणि पुर्वीच्या नंबरप्लेटमध्ये काही वेगळेपणा आढळून आला नाही. म्हणूनच रेडियम व्यवसायिकांना रेडियम बसवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्यातील रेडियम आर्टस् असोसिएशनचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल बनकर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

यावेळी महाराष्ट्र राज्यातील रेडियम आर्टस् असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप पाटील, सचिव पांडुरंग पवार आदी उपस्थित होते.

  • यावेळी बनकर म्हणाले, हायसेक्युरिटी नंबरप्लेटच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक करण्यात आली आहे. या नंबरप्लेटमुळे राज्यातील वाहन चोरांचे प्रमाण कमी झालेले नाही. ही नंबरप्लेट सुरक्षित कशी हा मोठा प्रश्न आहे. तसेच शोरूममधून या नंबरप्लेटचे पैसे अधिक प्रमाणात घेतले जातात. आम्ही शोरूमपेक्षा कमी किंमतीत नंबरप्लेट बसवून देतो. सरकार एकीकडे रोजगार वाढवण्याच्या गोष्टी करते. या निर्णयामुळे देशभरात लाखो युवक बेरोजगार झाले आहेत. पूर्वी रेडियम व्यावसायिकाला हे काम मिळत होते. आता फक्त आर.टी.ओ. मार्फत दिलेला एक ठराविक नंबर त्या प्लेटवर टाकला जातो.

शोरूमवाल्यानी दोन ते चार कंपन्यांशी करार केला आहे. त्या कंपन्या शोरूमकडे नंबरप्लेट देतात. शोरूममध्ये बसवण्याचे काम केले जाते. रेडियम व्यवसायिक ग्राहकांना पुर्णपणे नंबरप्लेट तयार करून व बसवून देत होते. परंतु आता आमच्याकडून कोणताही ग्राहक हे काम करून घेत नाही. आम्ही बेरोजगार झालो असून सरकारने आमचा गांभीर्याने विचार करावा. नंबरप्लेटची जबाबदारी ग्राहकांवर सोपवावी किंवा रेडियम व्यवसायिकांना अशा प्रकारची नंबरप्लेट बनवून देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी दरेकर यांनीही केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.