Pune : भाजप जिल्हा कार्यकारिणी विशेष निमंत्रित सदस्यपदी रघुवीर शेलार

खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. : Raghuveer Shelar as BJP District Executive Special Invited Member

एमपीसीन्यूज : पुणे जिल्हा (ग्रामीण) भाजप कार्यकारिणी विशेष निमंत्रित सदस्यपदी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष रघुवीर शेलार यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

पुणे जिल्हा (ग्रामीण) भाजप कार्यकारिणीची बैठक  बावधन (ता. मुळशी) येथे पार पडली. या वेळी रघुवीर शेलार यांच्यासह नूतन भाजप जिल्हा कार्यकारीणी, मोर्चा अध्यक्ष व सरचिटणीस तसेच आघाड्यांचे संयोजक व सहसंयोजक, जिल्हा कार्यकारणी सदस्य, विशेष निमंत्रित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली.

पुण्याचे खासदार गिरीश बापट, माजी राज्य मंत्री बाळा भेगडे, आमदार राहुल कुल, भीमराव तापकीर, माजी आमदार शरद ढमाले, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, जिल्ह्याचे प्रभारी योगेश गोगावले, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री रवी अनासपुरे आदी उपस्थित होते.

रघुवीर शेलार यांनी या पूर्वी भाजपची विविध पदे भूषविली आहेत. यामध्ये 2005 मध्ये ते देहूरोड येथील वॉर्ड क्र 1 भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष, 2008 मध्ये भाजपा युवा मोर्चा देहूरोड मंडल अध्यक्ष, 2011 मध्ये भाजपा युवा मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य म्हणून कामकाज पहिले आहे.

2015 मध्ये झालेल्या देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक एकमधून त्यांनी विजय मिळवला. सध्या ते देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष आहेत.

त्याचबरोबर शंकरराव शेलार नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष, मावळ प्रबोधिनी संस्थेचे प्रवक्ते, घोरवडेश्वर देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष आदी पदांची जबादारीही त्यांनी यशस्वीरीत्या सांभाळली आहे.

दरम्यान, शेलार यांच्या भाजप जिल्हा कार्यकारिणी विशेष निमंत्रित सदस्यपदी झालेल्या निवडीचे देहूरोडसह जिल्हास्तरावर स्वागत करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.