Pune : राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा; पुण्यात कॉंग्रेसचे आंदोलन

एमपीसी न्यूज : काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी (Pune) 2019 मध्ये कर्नाटकच्या कोलार येथे आयोजित सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरून टीका केली होती. सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? असा प्रश्न त्यांनी विचारला होता. या विरोधात गुजरातमधील भाजपाचे माजी आमदार तथा माजी मंत्री पुरनेश मोदी यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. त्या प्रकरणी न्यायालयाने राहुल गांधी दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
त्या निर्णयानंतर देशभरात काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. त्याच दरम्यान पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर चौकात काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
यावेळी अरविंद शिंदे म्हणाले की, राजकीय जीवनात आजवर अनेक (Pune) वेळा आरोप प्रत्यारोप पाहिले. पण राहुल गांधी यांनी 2019 च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. त्यावर आज न्यायालयाने निर्णय दिला असून राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
राजकीय जीवनात एकमेकांवरील टीका टिप्पणी हसत खेळत स्वीकारली पाहिजे. पण हे भाजप नेत्यांना मान्य नसल्याचे दिसून येत आहे.
Pune News – एअर इंडिया तर्फे पुणे मुंबई विमान सेवा सुरू होणार
आमच्या विरोधात काही विधान केली, तर तुम्ही जेलमध्ये जाणार हेच आजच्या निर्णयामधून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध व्यक्त करीत आहोत. त्याच बरोबर आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही अधिक ताकदीने रस्त्यावर उतरून सरकार विरोधात लढा उभारणार असल्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला.