Pune : केवळ अभ्यासच नव्हे, तर समाजातील निरीक्षण देखील महत्वाचे – राहुल सोलापूरकर

एमपीसी न्यूज – समाजात वावरताना फक्त अभ्यासच नव्हे तर तुमचे निरीक्षण पण तुम्हाला लाख मोलाचे धडे देऊन जाते. शालेय जीवनातच या सगळ्या गोष्टी मुलांनी आत्मसात केल्या पाहिजेत म्हणजे भविष्यात त्याचा खूप उपयोग होतो. असे उद्गार सुप्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी काढले.  लायन्स क्लब ऑफ पूना वेस्ट आयोजित आंतरशालेय एकांकिका स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी ओमप्रकाश पेठे, योगेश कदम, बीपीनजी पाटोळे, पोलन कुरेश उपस्थित होते. लायन्स क्लब ऑफ पूना वेस्ट आयोजित आंतरशालेय एकांकिका स्पर्धेमध्ये ग.रा. पालकर हायस्कूलने सादर केलेल्या मधूरंजनी व मैत्रिणी या एकांकिकेला प्रथम पारितोषिक मिळाले तर सेवासदन न्यू इंग्लिश स्कूलने सादर केलेल्या पुन:श्च क्रांतीसूर्य या एकांकिकेला द्वितीय पारितोषिक मिळाले. या स्पर्धा भरत नाट्यमंदिरमध्ये पार पडल्या तर बक्षीस वितरण निवारा वृध्दाश्रम हॉल येथे झाले. यंदाचे स्पर्धेचे हे 23 वे वर्ष होते.

राहुल सोलापूरकर म्हणाले की, समाजात वावरताना फक्त अभ्यासच नव्हे तर तुमचे निरीक्षण पण तुम्हाला लाख मोलाचे धडे देऊन जाते. शालेय जीवनातच यासगळ्या गोष्टी मुलांनी आत्मसात केल्या पाहिजेत म्हणजे भविष्यात त्याचा खूप उपयोग होतो. मातृभाषेचे महत्व, भाषेचे संस्कार, शब्दाचे उच्चारण, भाषेवर असलेली पकड, त्याचा अभ्यास या सगळ्या गोष्टी खूप सहजरित्या आणि सोप्या भाषेत राहुल सोलापूरकर यांनी उलगडून सांगितल्या.

या स्पर्धेमध्ये एकूण 13 शाळांनी सहभाग घेतला. स्पर्धा प्रमुख म्हणून सीमा दाबके यांनी काम पाहिले. स्पर्धेचे परीक्षण माधूरी ओक व कल्पना देशपांडे यांनी केले. सूत्रसंचलन पल्लवी देशमुख यांनी केले तर आभार दीपाली ठाकर यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.