Pune : विश्रामबाग पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; 62 हजार 480 रुपयांचा माल जप्त

एमपीसी न्यूज – विश्रामबाग पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ज्ञानप्रभोधिनीजवळ गिरीधर पारिजात सोसायटी बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारला. सामाजिक सुरक्षा विभागाचे स्टाफ आणि पोलीस उपनिरिक्षक श्रीधर खडके यांनी शुक्रवारी (दि. 13) केली.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी पोलिसांनी जुगार खेळणारे आणि खेळविणारे अशा 26 लोकांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून रोख रक्कम 61 हजार 580 आणि जुगाराचे साहित्य 900 असा एकूण 62 हजार 480 रुपयांचा माल जप्त केला आहे. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी गोपनीय खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे हा छापा टाकला असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1