Pune : कुख्यात गुंड रोहीदास चोरगे टोळीतील फरार दोघे जेरबंद; आणेवाडी टोल नाका गोळीबार प्रकरण

युनिट - 1, गुन्हे शाखा, पुणे शहर पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज – सातारा महामार्गावरील आणेवाडी टोल नाका येथे टोल भरण्याच्या कारणावरून तेथील कर्मचाऱ्यांवर गोळीबार करून कर्मचाऱ्यांना मारहाण करून फरार झालेले कुख्यात गुंड रोहीदास चोरगे टोळीतील दोघांना जेरबंद करण्यात युनिट – 1, गुन्हे शाखा, पुणे शहर यांना यश आले. यातील लहू मानेवर सहकारनगर पोलीस ठाण्यात तीन आणि बिबवेवाडी पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल असल्याचे समोर आले आहे. या दोघांना अधिक तपासासाठी भुईंज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

लहु जनार्धन माने (वय 36 वर्षे, रा.सुखसागरनगर, बनकर शाळेचे मागे, कात्रज, पुणे) आणि भगवान महादेव खुटवड (वय 45 वर्षे, रा.प्लॅट नं 11, गुरूदत विहार, शनी मंदीराजवळ, भारती विदयापीठ, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

  • याबाबत मिळालेली माहिती अशी, सातारा-पुणे महामार्गावरील आणेवाडी टोलनाक्यावर दि. 25 मार्च 2019 रोजी 01.00 वाजताच्या सुमारास टोलवरुन झालेल्या वादातून पुण्यातील कुख्यात गुंड रोहीदास ऊर्फ बापू चोरगे आणि त्याचे इतर साथिदारांनी गोळीबार करुन टोलनाक्यावरील कर्मचा-यांना मारहाण केली होती. त्याबाबत भुईज पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला होता. त्यापैकी काही आरोपी दाखल गुन्हयांत अटक केली होती. या गुन्ह्यात रोहीदास चोरगे याचेसह काही आरोपी अद्याप फरारी आहेत.

युनिट -1, गुन्हे शाखा पुणे शहर यांचेकडील अधिकारी आणि कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना पोलीस कर्मचारी अमोल पवार यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील फरारी असलेले आरोपी लहु माने आणि भगवान खुटवड हे कोंढवा येथील टिळेकरनगर चौकात येणार आहेत. याची पोलीस निरीक्षक अरुण वायकर यांना माहिती देऊन वरिष्ठांच्या परवानगीने युनिट-1, गुन्हे शाखा, पुणे शहर पथकाकडील स्टाफसह खबरप्रमाणे जाऊन या दोन  आरोपीस ताब्यात घेऊन नाव, पत्ता विचारता त्यांनी लहु जनार्धन माने (वय 36 वर्षे, रा.सुखसागरनगर, बनकर शाळेचे मागे, कात्रज, पुणे) आणि भगवान महादेव खुटवड (वय 45 वर्षे, रा.प्लॅट नं 11, गुरूदत विहार, शनी मंदीराजवळ, भारती विदयापीठ, पुणे) असे असल्याचे सांगितले.

  • तसेच त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, आम्ही आमचे मित्र रोहीदास चोरगे, सोपान चोरगे, लक्ष्मण लेकावळे, हरगुडे व इतर साथिदार असे मार्च महिन्यामध्ये मित्रांच्या मोटरमधून कोल्हापूर येथून देवीदेर्शन घेऊन पुण्याला परत येत असताना आणेवाडी टोलनाक येथे टोल भरण्याच्या कारणेवरुन भांडणे झाली. त्यावेळी आम्ही गोळीबार करुन आम्ही पळून गेलो. या गुन्हा दाखल झाल्यापासून आम्ही फरार होतो, असे सांगितले आहे. त्यानुसार या दोघांना पोलिसांनी अटक करून भुईंज पोलीस स्टेशन, सातारा येथे दाखल गुन्ह्यानुसार भुईंज पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.