Pune Railway : पुणे येथून दानापूर, कानपूरसाठी 28 विशेष रेल्वे

एमपीसी न्यूज – पुणे ते दानापूर आणि पुणे ते कानपूर या मार्गावर( Pune Railway )आगामी सण, उत्सवांसाठी 28 विशेष साप्ताहिक रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या गाड्या 1 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीत सुटणार आहेत.

पुणे-दानापूर साप्ताहिक विशेष रेल्वे – 8 गाड्या (21 एलएचबीकोच)

01415 साप्ताहिक विशेष रेल्वे (4 गाड्या) 10 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या (Pune Railway )कालावधीत प्रत्येक शुक्रवारी सायंकाळी 07.55 वाजता पुणे येथून सुटेल. ही गाडी तिसऱ्या दिवशी पहाटे 04.30 वाजता दानापूर स्थानकावर पोहोचेल.

Pimple Saudagar: अखेर रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात
01416 साप्ताहिक विशेष रेल्वे (4 गाड्या) 12 नोव्हेंबर ते 03 डिसेंबर या कालावधीत प्रत्येक रविवारी सकाळी 06.30 वाजता दानापूर येथून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सायंकाळी 05.35 वाजता पुणे येथे पोहोचेल.
ही गाडी दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापुर, कोपरगाव, अंकाई, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपुर, कटनी, मैहर, सतना, मानिकपुर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा दानापूर स्थानकावर थांबेल.

पुणे-दानापूर साप्ताहिक विशेष रेल्वे – 10 गाड्या (23 आईसीएफ कोच)

01039 साप्ताहिक विशेष रेल्वे (5 गाड्या) 4 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत प्रत्येक शनिवारी सायंकाळी 07.55 वाजता पुणे येथून सुटेल. ही गाडी तिसऱ्या दिवशी पहाटे 04.30 वाजता दानापूर येथे पोहोचेल.
01040 साप्ताहिक विशेष रेल्वे (5 गाड्या) 6 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीत प्रत्येक सोमवारी सकाळी 06.30 वाजता दानापूर येथून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी 05.35 वाजता पुणे येथे पोहोचेल.
ही गाडी दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापुर, कोपरगांव, मनमाड, भुसावळ, खंडवा (फक्त 01039 या गाडीसाठी), इटारसी, पिपरिया, जबलपुर, कटनी, मैहर, सतना, मानिकपुर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा दानापूर या स्थानकांवर थांबेल.

पुणे-कानपूर साप्ताहिक विशेष रेल्वे – 10 गाड्या (23आईसीएफ कोच)

01037 साप्ताहिक विशेष 1 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक बुधवारी सकाळी 06.35 वाजता पुणे येथून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी 07.10 वाजता कानपूर येथे पोहोचेल.
01038 साप्ताहिक विशेष 2 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक गुरुवारी सकाळी 08.50 वाजता कानपूर येथून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी 12.05 वाजता पुणे येथे पोहोचेल.
ही गाडी दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापुर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, रानीकमलापति (हबीबगंज), बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाँसी, उरई कानपूर येथे थांबेल.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.