Pune Railway Division: पुणे रेल्वे विभागात सहा महिन्यात विना तिकीट प्रवाशांकडून 12 कोटींची विक्रमी दंडवसुली

एमपीसी न्यूज – पुणे रेल्वे विभागात (Pune Railway Division) सप्टेंबर महिन्यात तिकीट तपासणीदरम्यान 22 हजार 194 प्रवासी विना तिकीट प्रवास करताना आढळून आले व त्यांच्याकडून 1 कोटी 70 लाख रुपयांहून जास्त दंड वसूल करण्यात आला. चालू आर्थिक वर्षाचे 12 कोटी रुपयांचे उद्दिष्ट सुरुवातीच्या 6 महिन्यांतच पूर्ण करण्यात आले आहे. ही एक विक्रमी कामगिरी आहे.

या व्यतिरिक्त 4052 जणांना अनियमित प्रवासासाठी 23 लाख 12 हज़ार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे, तसेच सामान बुक न करता तसेच घेऊन जाणाऱ्या 309 जणांकडून 35 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

या वर्षी एप्रिल ते सप्टेंबर या 6 महिन्यांत 1 लाख 72 हज़ार 573 केसेस मध्ये 12 कोटी 04 लाख 47 हजार रूपये दंड स्वरूपात वसूल करण्यात आला. अशा प्रकारे चालू आर्थिक वर्षाचे 12 कोटी रुपयांचे उद्दिष्ट सुरुवातीच्या 6 महिन्यांतच पूर्ण करण्यात आले आहे. ही एक विक्रमी कामगिरी आहे.

ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा (Pune Railway Division) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रजेश कुमार सिंह आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे आणि विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे यांच्या समन्वयाने तिकीट निरीक्षकांद्वारे करण्यात आली.

Bibwewadi Police : माजी आमदारास खंडणी मागणाऱ्या सराईत गुन्हेगाराला तेलंगणामधून अटक

रेल्वे प्रशासनाकडून अशा प्रकारे तिकीट तपासणी मोहीम सातत्याने सुरू आहे. प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की, त्यांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा. अन्यथा त्यांना रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल आणि न भरल्यास तुरुंगवासही होऊ शकतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.